कोरोनो । तुळजाभवानीचे मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद

महाराष्ट्रात प्रत्येक दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मंदिरातले सगळे विधीही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तूर्तास तरी 31 मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाची प्रादुर्भाव जर वाढला तर पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.

No comments