'मुख्यमंत्री म्हणून 'हा' निर्णय सर्वाधिक समाधान देणारा'


'राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज स्पष्ट केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस (100 days of maha vikas aghadi government) पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात खास पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा आढावा घेतला.


No comments