हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना नाळ फौंडेशन चा मदतीचा हात
पुणे ५०० गरजूंना किराणा सामानाचे वाटप
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम - हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी अध्यक्ष मा. सुजित भाऊ थिटे असलेल्या '*नाळ फौंडेशन* च्या वतीने अशा ५०० गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात येत आहे.
अशा गरजू लोकांची पुणे शहराच्या विविध भागातून एक यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नसून, शासकीय नियमांचे पालन करीत *नाळ फौंडेशन * च्या वतीने त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. आज व उद्या हे वाटप केले जाणार असून आणखी कोणी गरजू असल्यास त्यांनी आपापल्या भागात वा *नाळ फौंडेशन *पदाधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करावा, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन *नाळ फौंडेशन* विश्वसवत यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु ज्या गरीबांचे निव्वळ हातावर पोट आहे, अशा लोकांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ शकते, यामुळे *मा. सुजित भाऊ थिटे* यांच्या संकल्पनेतून पुणे अशा ५०० लोकांची यादी करून त्यांना *नाळ फौंडेशन* या सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद असे साधारण २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप केले जात आहे.
No comments