तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते यांनी घेतला गावोगावी जाऊन आढावा

आज उदयनगर चौंडेश्वरी वाडी ग्रामपंचायत येथे माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिते यांनी उदयनगर मध्ये भेट देऊनआरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी सांगितले.
 तसेच करोना आजाराच्या बाबतीत बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची विचारपूस केली.  लॉक डाऊन असताना कोणीही घरातून बाहेर पडू नका, आरोग्याची काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी चौंडेश्वरी वाडी सरपंच संजय कडाळे, सरपंच सतीश शिंदे तसेच अंगणवाडीसेविका कुंभार मॅडम व आशा सेविका वैशाली शिंदे, कांबळे मॅडम उपस्थित होते.

No comments