लोकविकास मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

लोकविकास इंग्लिश मिडीयम स्कूल वेळापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकविकास च्या सर्व विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व पुस्तक भेट देऊन केला. यामध्ये श्रावणी पिसे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, इशिता माने हिने प्रस्तावना केली , मोठ्या गटाच्या विद्यार्थिनींनी मनोगते मांडली व आभार श्रावणी बंदीछोडे हिने मानले. कार्यक्रमासाठी इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सीमा उरणे,यांनी थोर स्त्री समाजसेविका यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी  क्रीडा विभाग प्रमुख अजित बनकर ,कॉलेज विभाग प्रमुख अमोल पांढरे उपस्थित होते.

No comments