व्यापारी पेठेत परंपरेची होळी संपन्न

वेळापूर, ता. माळशिरस येथील व्यापारी पेठेमध्ये परंपरेची होळी संपन्न झाली. पत्रकार ओंकार आडत यांच्या शुभहस्ते या होळीचे पूजन करण्यात आले. 
सुमित साखरे मित्र परिवार व नवतरुण गणेशोत्सव मंडळाकडून या होळीचे आयोजन करण्यात आले होते. व्यापारी पेठेत पूर्वीपासून सर्वच सण व उत्सव परंपरेने साजरे केले जातात. याच अनुषंगाने आज होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवतरुण गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सुमित साखरे मित्र परिवार उपस्थित होता. 

No comments