जनसेवा संघटना । महिला दिनानिमित्त भरल्या खणा नारळाने ओटी


 जागतीक महीला दिना निमित्त  समाजीतील विविध क्षेत्रातील यशस्वी अनेक महीलांचा सन्मान केला जातो  पण अत्यंत दुर्लक्षीत भाजी मंडईतील महीलांचा दररोजचा संघर्ष पाहीला तर या महीलांना सलाम केलेशिवाय राहणार नाही आपण सकाळी मंडईला जातो भाजी घेऊन लगेच येतो पण भाजी विकणा-या महीलांचा जीवनमानाचा कधीच विचार करत नाही  घरगुती अडचणीमुळे अनेक महिला भाजी मंडईत भाजीपाला विकताना दिसतात  ख-या अर्थाने अनेक अडचणीतुन मार्ग काढत अनेक संकटावर मात करून एक कुटुंब जगवणे वाढवणे दररोज पहाटे लवकर उठायचे कुटुंबासाठी स्वयंपाक करायचा पाऊस असो अथवा कडाक्याची थंडी
 पहाटेच भाजी मार्केट मध्ये जाऊन मोठ्या हिमतीने पुरूषाचे बराबरीने पुढे होऊन  लिलावात भाग घेऊन मोठी बोली लावुन भाजी घेणे पैसे वाचवणे साठी हमाल न लावता घेतलेला माल स्वःता भरणे मार्केट मधुन मंडईत घेऊन येणे तिथे दुकान लावणे माल मांडणे त्यानंतर दिवसभर  मंडईच्या गर्दितील धुळीमध्ये दिवसभर उन्हात बसणे दिवसभर वेगळया वेगळया स्वभावाचे लोकांना सामोरे जाणे अशा पद्धतीने पहाटे पांच वाजलेपासुन सायंकाळी 8 वाजेपर्यंत तारेवरची कसरत  असुणही कुटुंब आणी व्यवसाय याचा मेळ घालुन कुटुंबातील मुला मुलींचे शिक्षण, नवरा, सासु सासरे यांची सेवा करणे अशा प्रकारे पावलो पावली असणा-या संघर्षाशी लढा करून यावर मात करित दररोजच जिंकणा-या मंडईतील भाजीपाला विकणारी प्रत्येक महीलां ख-या अर्थाने रणरागीणी आहे आणि या  रणरागीणीचा ओटी भरून सन्मान जनसेवा महिला संघटनेचे वतीने अकलुज भाजी मंडई येथे मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहीते पाटील व सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहीते पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक महीलेचे दुकानी जाऊन सुमारे 160 महीलांचा खन नारळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणेत आला जनसेवा संघटनेच्या पदाधिकारी जोतीताई कुंभार,शाहीन बागवान,जयश्री राजगुरु, आशा जगताप, रूपाली गांधी  यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

No comments