सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते : सारीका शिंदे

कुठल्याही पुरुष किंवा मुलांमध्ये सकारात्मक विचारांच्या देवाण-घेवाणाची सुरुवात त्याचा घरांपासूनच होते. मुलांवर प्रथम संस्कार त्याची आई देते. स्त्रीमध्ये सकारात्मक विचारांची देवाण - घेवाण करण्याची ताकद असते असे मत अकलूज पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सारीका शिंदे यांनी व्यक्त केले . 
जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दल अंतर्गत वेळापूर पोलिस ठाण्याच्या वतीने महिलांच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचे उद्घाटन स्नेहल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी वेळापूरचे सपोनि दीपक जाधव , पंचायत समिती सदस्या रेणुका माने देशमुख , महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा चंद्रकला भिसे , सीमा खाडे , डॉ . शुभांगी नाईक , वंदना कचरे , लक्ष्मी थोरात , सुपरवायझर इंगोले , नफीसा शेख , जयश्री काटे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या . 

शिंदे म्हणाल्या , मुलं घरात किंवा कौटुंबिक वातावरणात  शिकत असतात .  त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांचे विचारांचा चांगला किंवा वाईट प्रभाव पडत असतो. समज आल्यावर तो पण त्या चांगल्या विचारांमध्ये सामील होतो. पुरुषांच्या मानसिकतेवर, विचारसरणीवर, घरातील स्त्रियांचा विशेष प्रभाव पडत असतो. तसेच त्यांचा विचारांचा ही प्रभाव स्त्रियांवर पडू शकतो. 
यावेळी विविध क्रिडा स्पर्धात यश संपादन केलेल्या साधना बाबर यांना पैठणी भेट देण्यात आली तर क्रिडा स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर यश संपादन केलेल्या १४ विद्यार्थीनीना पोलिस ठाण्याच्या वतीने खेळाचे साहित्य देण्यात आले .

No comments