लोकविकास च्या विद्यार्थ्यांचे अबॅकस मध्ये दैदिप्यमान यश


सुपर फास्ट अबॅकस अॅन्ड वैदिक मॅथ्स यांच्या मार्फत अबॅकस सेंटर लेवल परीक्षा घेण्यात आल्या.यामध्ये लोकविकास शिक्षण प्रसारक संस्थेतील सृष्टी प्रविण टाकसाळ,आदित्य सुर्यकांत कदम,नयन महेंद्रकुमार माने देशमुख,समृद्धी राहुल बनकर,योगिनी विवेक जोशी,स्वरा विकास माने,ज्ञानेश्वरी महेश म्हेत्रे,ईशिता सयाजिराव माने देशमुख,श्रावणी प्रदिप बंदिछोडे,पवन राजीव व्होरा,मृदुल राजीव व्होरा,आदित्य चंद्रकांत नवले,अथर्व जालिंदर बनकर,वृषभ भागवत गायकवाड, वेदांत विशाल बनकर,आयुष रमेश बनकर, आदित्य सुभाष चौगुले,सानिका दिलीप पवार या विद्यार्थ्यांनी  गोल्ड मेडल पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक ओंकार माळवदकर यांचा गुणगौरव आर्मीतील इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेन्टेनन्स विभाग प्रमुख माननीय श्री राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला .  संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर,  अध्यक्षा वैशालीताई बनकर, मुख्याध्यापक किशोर  पिसे, मुख्याध्यापिका सीमा उरणे,क्रीडा विभाग प्रमुख अजित बनकर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख अमोल पांढरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले केले व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी शिंदे यांनी केले.तर आभार प्रीती पांढरे यांनी मानले.

No comments