mpsc । ५ एप्रिल ची परीक्षा पुढे ढकला : अँड. सुजितकुमार थिटे

दिनांक ५ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी सर्वात मोठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे . सदर परीक्षेस जवळपास ४ लाख विद्यार्थी बसणार आहेत . यामध्ये पुणे शहरात 40 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत . सदर परीक्षेस विविध शहरातील विद्यार्थी येतात . तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी जिल्हा केंद्र तथा पुणे शहरात येणार आहेत . सोबतच परीक्षेच्या निमिताने अनेक विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार आहेत . यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढवण्याचा तसेच या विषाणूचे संक्रमण ग्रामीण भागात जाण्याचा जास्त धोका आहे व तो नाकारता येत नाही . तसेच 15 मार्च ते 31 मार्च या दरम्यान अभ्यासिका , क्लासेस , मेस बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत . सदर गोष्टीचा या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तथा मानसिकतेवर परिणाम झाला आहे , असे निदर्शनास येत आहे . कोरणा विषाणूच्या भितीमुळे अनेक पालक 5 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या मुलांना कोरोना चा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पुणे शहरात पाठवण्यासाठी तयार नाहीत . त्यामुळे अनेक वर्षापासून या परिक्षेची तयारी करत असलेल्या हजारो - लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा , हीच सर्व विदयार्थ्यांची मागणी आहे . 
त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अँड. थिटे यांनी केली आहे. 

No comments