sangola । पानटपरी उघडी ठेवल्याने एकावर गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून पानटपरी उघडी ठेवल्याने जुनोनी, सांगोला येथील एका इसमावर गुन्हा दाखल करणेत आला आहे.
याबाबत पोना विजय केशव थिटे यांनी फिर्याद दिली असून त्यांचे फिर्यादीनुसार,
सध्या संपुर्ण देशामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन सोलापुर जिल्ह्यामध्ये नागरींकाची एक ठिकाणी होणारी गर्दि टाळणेसाठी जिल्ह्यात सामाजिक,राजकिय,धार्मिक,क्रिडाविषयक कार्यक्रमांना तसेच तसेच तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होउ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारे दुकाने व पानटप-या बंद करणेबाबत मा.जिल्हाधिकारी सो.सोलापुर यांचेकडील आदेश जा.क्र.2020/डीसीबी/2/आरआर/1951/दिनांक-19/03/2020 या आदेशान्वये बंदि घालणेत आली आहे. दिनांक-20/03/2020 रोजी राञौ ८ चे सुमारास मा.पोलिस निरीक्षक सो.यांचे मार्गदर्शनाखाली मी व पोना811 चौगुले , पोकाँ 1839 शिंदे असे खाजगी वाहनाने कोरोना विषाणु संबंधाने लोकांना जनजागृती करणेसाठी पोलिस ठाणे हद्दित गस्त करीत असताना आम्ही एस.टी. स्टँड जुनोनी ता.सांगोला या गांवामध्ये आलो असता तेथे इसम नामे प्रवीण हनुमंत व्हणमाने वय-26 वर्ष रा जुनोनी ता.सांगोला हे त्यांची पान टपरी उघडी ठेवुन लोकांना तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीत होते. त्यामुळे सदर धुम्रपानाचे माध्यमातुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढणेची शक्यता आहे. तरी त्याने मा.जिल्हाधिकारी सो.यांनी भारतीय साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे अवज्ञा केली म्हणुन माझी इसम नामे प्रवीण हनुमंत व्हणमाने वय- 26 वर्ष रा.बामणी ता.सांगोला यांचे विरुध्द भादंवि कलम 188 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे.
No comments