velapur । जमावबंदी नियमाचे उल्लंघन, वेळापूरच्या तिघांवर गुन्हा दाखल

वेळापूर, ता. माळशिरस येथे जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून गर्दी जमावल्याने कार्यक्रमाचे आयोजक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की,
दिनांक 16 / 03 / 2020 रोजी रात्री 9 . 15 वा . चे सुमारास मौजे वेळापूर ता . माळशिरस गांवात पालखी मैदानाजवळ सुमित्रानगर येथे 1 ) सिकंदर दादामियाँ कोरबू 2 ) रमजान लाडोबा नदाफ 3 ) हुसेन शेख ( गुळगुळया ) तिघेही रा . वेळापूर ता . माळशिरस यांनी मा . जिल्हादंडाधिकारी  सोलापूर यांचे उपरोक्त कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकरीताचे बंदी आदेशाचे उल्लंघन करून लोकांची गर्दी जमवून " जश्ने ख्वाजा गरिब नवाज कॉन्फरन्स " असे बोर्ड लावून जाहिरपणे जेवणाचा कार्यक्रम केला आहे . म्हणून मंडलअधिकारी विलास रणसुभे यांनी त्यांचेविरुध्द भा . द . वि . क 188 , 34 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 139 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
सदर प्रकरणी वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास विनोद साठे हे करीत आहेत. 

No comments