वेळापूर । महात्मा फुले जयंतीनिमित्त औषध फवारणी, मास्क वाटप
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वेळापूर, ता. माळशिरस येथील महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीने संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आली.
सहाय्यक फौजदार काझी व पोना बनसोडे यांच्या शुभहस्ते टॅक्टर ची पूजा करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर ब्लोअर द्वारे सम्पूर्ण गावात हे निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावात ठिकठिकाणी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री करणाऱ्या सर्वाना मास्क चे वाटप ही करण्यात आले. तसेच वाड्या वस्त्यांवरील कामगार वर्गाला किराणा सामानाचे वाटप ही करण्यात आले.
सगळीकडे लॉक डाऊन असल्याने सार्वजनिक ठिकाणी जयंती समारंभ साजरे करण्यास परवानगी नाही. तसेच राज्यासह देशात कोरोनो व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. या कठीण काळात सामाजिक कामाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून महात्मा फुले युवा मंच च्या वतीने सगळीकडे निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली.
यासाठी जीवन वाघे यांनी आपला ट्रॅक्टर मोफत दिला तर महात्मा फुले युवा मंच च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
■ घरोघरी जयंती साजरी.
सगळीकडे बंद असल्याने सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.
No comments