पुणे विभागातून 45 हजार मजुरांना घरी पाठवण्यासाठी धावल्या रेल्वेगाड्या – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील ४५ हजार ३०२ मजूरांना घेऊन पुणे विभागातून ३६ विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी १४, उत्तरप्रदेशसाठी १४, उत्तराखंडसाठी १, तामिळनाडूसाठी १, राजस्थानसाठी ३ व बिहारसाठी ३ अशा एकूण ३६ रेल्वेगाडया ४५ हजार ३०२ मजुरांना घेऊन धावल्या.
No comments