माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण नाही, काही जण रुग्णाच्या संपर्कात आल्याची माहिती

माळशिरस तालुक्यात आज दुपारी पर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात आज दुपारी पर्यंत एकही कोरोना रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
मात्र काही लोक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधुन समोर आले असल्याने त्याठिकाणी आरोग्य विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

■ आरोग्य विभागाने दिले स्पष्टीकरण

🟣आरोग्य विभाग माळशिरस 
🔅COVID19 UPDATES🔅
दिनांक:-25/5/2020
 
माळशिरस तालुक्यातील आजच्या परिस्थितीनुसार कळवितो की , अनेक ठिकाणावरून विचारणा होत आहे, परंतु तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत कुठलीही करोना पॉझिटिव्ह केस निघालेली नाही. इतर तालुक्यात पॉझिटिव निघालेल्या रुग्णाचे काही कॉन्टॅक्ट आपल्या तालुक्यात आहेत ... पुढील कार्यवाही सुरू आहे... घरातच थांबा
...घाबरू नका.. अफवा पसरवू नका.... पण अति  सतर्क रहा..  

डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.🟣

No comments