पिलीव परिसरातील पत्रकारांची आरोग्य तपासणी व मास्क, सॅनिटायझर किटचे वाटप


माळशिरस तालुका आरोग्य विभाग व द पॉवर ऑफ मीडिया रजिस्टर पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांच्या कोविड 19 च्या अनुषंगाने पिलीव परिसरातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. 
यावेळी पत्रकारांसाठी कोरोनाची पूर्व तपासणी करण्यात आली. यामध्ये विविध बेसिक टेस्ट करण्यात आल्या,असून आवश्यक वाटल्यास पुढील टेस्ट केल्या जाणार असून पत्रकारांच्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तापमान तपासणी, थर्मल स्कॅनिंग, शरीरातील ऑक्सिजन तपासणी, शुगर, बी पी व रक्ताचे नमुने तपासण्यात आले. 
सदर तपासणी शिबीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ.संतोष माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आले. यावेळी पत्रकार दामोदर लोखंडे,रघुनाथ देवकर,संजय पाटील, रामभाऊ मगर,उदय कदम,शुभजीत नष्टे,संजय रोकडे,शाहरुख मुलाणी,महेश घाडगे आदी पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे द पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ओंकार आडत यांनी सांगितले.

■  आमदार सातपुते यांचेकडून सनिटायझर !

आमदार रामभाऊ सातपुते यांचेकडून तालुक्यातील पत्रकारांना तपासणी शिबीर दरम्यान मास्क व सॅनिटायझर चे किट देण्यात आले असून पत्रकारांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 


No comments