महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना वतीने गिरझणी येथे रक्तदान शिबीर
कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे हा संसर्गजन्य रोग संपूर्ण भारतात फैलावत आहे. कोरोनाचे संसर्गामुळे आणी शाळा महाविद्यालयाला सुट्टी असलेने सगळीकडे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे बाकी सगळ्या गोष्टीला पर्याय आहेत पण रक्ताला दुसरा पर्याय नाही या पार्श्वभूमीवर जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी स्वःता रक्तदान करून जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं होते. या आव्हानास अनुसरून जनसेवा संघटनेचे 1000 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले असुन याच अनुशंगाने आज रविवार दिनांक 12/4/2020 रोजी गिरझणी या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले गिरझणी गावात 165 रक्तदात्यांनी रक्तदान केले महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना , ग्रामपंचायत गिरझणी व सर्व ग्रामस्थ गिरझणी ता माळशिरस यांचे सयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन केले होते या शिबीरात 165 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला गिरझणी गावातील सर्व ग्रामस्थानी पुढाकार घेवूण मोठ्या उत्साहात रक्तदान केले सदरचे रक्तदान शिबीर अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने केले होते कोरोना संसर्गाचे आपत्ति मुळे सोशल डिस्टंनस ठेवुण नियोजन उत्तम प्रकारे नियोजन केले होते त्यामुळे रक्तदात्यांना कोणतीही अडचण न येता रक्तदान करता आले या संकटाच्या काळात आपण देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणुन देशासाठी फूल ना फूलाची पाकळी या उदात्त हेतुने रक्तदान केलेची रक्तदात्यांची भावना होती या शिबीरात सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेचे कर्मचारी यांनी रक्तसंकलन करण्यासाठी सहकार्य केले या शिबीराचे आयोजन शंकरराव मोहीते पाटील बॅकेचे चेअरमन सतीश नाना पालकर यांचे नेतृत्वाखाली करणेत आले माजी सरपंच विजय माने ,हरी माने, कांता पवार, रमेश पवार, अजिनाथ जाधव,मोहन चव्हाण,शंकर चव्हाण,मयुर माने, सचिन गायकवाड ,सागर देशमुख,बाळासाहेब सोनवले,प्रदिप कन्हाळ सर, उमेश साठे यांनी या शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले.
No comments