एक देश एक रेशनकार्ड'ची घोषणा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या आर्थिक पॅकेजची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आता आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद झाली.

एक देश एक रेशनकार्ड'ची घोषणा - देशातील कोणत्याही रेशन दुकानातून स्थलांतरीत मजूर 5 किलो धान्य घेऊ शकतात. 5-5 किलो गहू आणि तांदूळ मिळतील सोबतच 1 किलो डाळ मिळेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

▪️मुद्रा योजनेतून 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना 2 टक्क्यांची मदत
▪️कमी भाड्यामध्ये मजूर आणि शहरी गरिबांना घर मिळणार
▪️प्रवासी मजुरांना 2 महिन्यांचं धान्य देणार, प्रवासी मजुरांसाठी भाडे तत्वावर घराची योजना
▪️रेशन कार्डचा वापर संपूर्ण देशभरात कुठेही करता येणार, रेशन कार्ड नसलेल्यांना 5 किलो धान्य देणार
▪️महिलांनाही रात्री काम करण्याची सूट
▪️मजुरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणार
▪️गरीब कल्याण योजनेतून मजुरांना मदत, आतापर्यंत 2 कोटी 33 लाख मजुरांना काम दिलं
▪️शहरातील बेघर नागरिकांना 3 वेळचं जेवण
▪️गेल्या दोन महिन्यांत 7200 बचत गटांची स्थापना, बचत गटांनी 1 लाख 20 हजार लिटर सॅनिटायझर बनवलं, 12 हजार बचत गटांकडून 3 कोटी मास्कची निर्मिती
▪️सहकारी-ग्रामीण बँकांसाठी 29 हजार 500 कोटी रुपये
▪️शहरी भागातील गरिबांना 11 हजार कोटी रुपयांची मदत
▪️शेतीसाठी 86 हजार 600 कोटींचं कर्ज दिलं आहे, 31 मे पर्यंत शेती कर्जाच्या व्याजावर सूट
▪️महिन्याभरात 25 लाख किसान क्रेडिट कार्डचं वाटप, वर्षभरात 3 कोटी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून कर्जाचा लाभ मिळाला
▪️स्थलांतरित मजुरांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार
▪️मजूर, शेतकरी, फेरीवाले यांच्यासाठी खास आर्थिक पॅकेज मजुरांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा
▪️आजच्या उपक्रमांमध्ये एकूण 9 उपाययोजना आहेत. स्थलांतरित मजुरांशी संबंधित 3 , रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी 1, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे, छोटे शेतकरी 2 , गृहनिर्माण 1 इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश.
----------------------------------------------------

No comments