सोलापूर रेल्वे स्टेशनवरुन ११४६ नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरसाठी श्रमिक विशेष रेल्वे रवाना
रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो, याचीच आतुरता लागून राहिली होती. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी असे चित्र होते. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक इत्यादी नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली.
No comments