अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेऊन तिच्याशी गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे मागील एक वर्षांपासून घडली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बावधन येथील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडित मुलीसोबत आरोपीने प्रेमसंबंध ठेवले. मागील एक वर्षांपासून मुलीला फूस लावून त्याच्या घरी नेले. पीडित मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.  त्यानंतर पीडित मुलीच्या आईने गुन्हा नोंदवला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

No comments