वेळापूर । लॉकडाऊन काळात जि. प. शाळेचे ४० हजारांचे मॉनिटर गेले चोरीला
लॉक डाऊन काळात वेळापूर, ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील ४० हजार रुपये किंमतीचे आठ मॉनिटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक मारुती क्षीरसागर यांनी वेळापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून लॉक डाऊन काळात शाळा बंद होती. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने शाळेच्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून चाळीस हजार रुपये किंमतीचे आठ मॉनिटर चोरून नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याबाबत वेळापूर पोलिसांत तक्रार दाखल झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
No comments