लॉकडाऊन काळात वेळापूरच्या पै. सचिन चव्हाण यांनी बनवला कुस्तीचा आखाडा

लॉक डाऊन काळात कुस्तीप्रेमी  व महाराष्ट्रातील अनेक नामांकित कुस्ती स्पर्धा जिंकलेले वेळापूर चे पैलवान सचिन चव्हाण यांनी आपल्या घरी चक्क कुस्तीचा आखाडाच तयार केला आहे. 
वेळापूर चे ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण यांचे सुपुत्र पै सचिन चव्हाण यांनी आपल्या घराच्या शेजारी एक कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. यामध्ये लाल माती, दूध, तूप, हळद आदी गोष्टींचा वापर करून ग्रामीण भागातील कुस्तीप्रेमींना कुस्ती शिकायला व पैलवानांना रोज सराव करण्यासाठी त्यांनी हा आखाडा तयार केला आहे. तसेच मल्लांना राहण्याची सोय ही त्यांनी याठिकाणी केली आहे.
लॉक डाऊन संपल्यावर या आखाड्यात ग्रामीण भागातील अनेकांना स्वतः पै सचिन चव्हाण हे कुस्तीचे धडे शिकवणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून व राज्यातील कुस्ती प्रेमींकडून कौतुक होत आहे. 

No comments