वकिलांच्या सूचना केंद्र आणि राज्य सरकार पर्यंत पोहोचवू: सोलापूर सोशल फाऊंडेशन मार्गदर्शक आ. देशमुख
सन 1897 च्या महामारी कायद्यात बदल आणि मास्क आणि सोशल डिस्टंस न पाळणाऱ्याना शिक्षेची तरतूद करावी, या वकिलांच्या मागण्यात महत्त्वाच्या आहेत. त्या आपण आवश्यक केंद्र आणि राज्य सरकार पर्यंत पोहोचवू असे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले.
रविवारी कॉल कॉन्फरन्सद्वारे आमदार देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील वकिलांशी संवाद साधून त्यांचे कोरोना आजाराबाबत मार्गदर्शन घेतले तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. अनेक वकिलांनी अद्यापही नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती नाही, ती जनजागृती करावी, मास्क वापरावे आणि सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असल्याचे सांगत या दोन गोष्टी न करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी असा कायदा तयार करावा, अशी मागणी केली. माढा येथील वाघमारे यांनी राज्य सरकारने निराधार लोकाना मदत करावी, अशी अपेक्षा केली तर ॲड. प्रमोद जाधव यांनी विकलांग लोकांना शासनाने घरपोच डबा द्यावा जेणेकरून शास्त्रीनगर येथील घटना पुन्हा घडणार नाही, असे सांगितले. ॲड. एस. एस. महिंद्रकर यांनी महापालिकेने प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी असे सुचवले. अनेक वकिलांनी सर्व वस्तू नागरिकांपर्यंत ऑनलाइन पोहोचवाव्यात, अशी मागणी केली. यावेळी योगेश मुकणे, ॲड. दत्ता चव्हाण यांच्यासह अनेक वकिलांनी आमदार देशमुख यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार देशमुख म्हणाले की वकिलांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या जिल्हा प्रशासन केंद्र आणि राज्य स्तरावर पोहोचण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून आपण निश्चित प्रयत्न करू. वकिलांच्या ही ज्या काही अडचणी आहेत त्यावरही आपण मार्ग काढण्यासाठी शासनाला साकडे घालू.
No comments