लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणावर भर, पहिली ते बारावी प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र चॅनेल
कोरोना संसर्गामुळे जगभरात बदलेल्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. ‘वन क्लास, वन चॅनेल’ या योजनेद्वारे पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी स्वतंत्र चॅनेल तयार केले जातील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
No comments