अकलूज । क्रीडा संकुलसह सर्व दुकाने उघडणार
उद्या दि. ०७ जून पासून अकलूज, ता. माळशिरस मधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल सह शहरातील केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टारेंट व पानटपरी इत्यादी वगळून सर्वच दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु होणार आहेत.
ग्रामपंचायत अकलूज ने दिलेली सूचना :
अकलूज गावातील व परिसरातील नागरिकांना कळविण्यात येते की,अकलूज ग्रामपंचायत वतीने शासकीय नियमानुसार खबरदारी उपाययोजना अनुसरून,अकलूज मधील असलेल्या व्यापार व व्यवसाय सोशल डिस्टन्सींग तसेच कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवरील इतर नियम व सूचनांचे पालन करीत *रविवार दिनांक-7/06/2020 पासून जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर जिल्हा यांचे संदर्भिय पत्र जा.क्र.2020/डीसीबी-02/आर आर/2297 दिनांक-31/05/2020 नुसार गावातील सर्व मार्केट / दुकाने (केश कर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टारेंट व पानटपरी इत्यादी वगळून ) दररोज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरक्षित अंतर (social distancing ) चे नियम पाळून उघडी राहतील*..तसेच *अकलूजमधील नागरिकांसाठी रविवार दिनांक- 7/6/2020 पासून विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल शासनाच्या नियमांचे पालन करून खुले करण्यात येत आहे*.आपणांस विनंती आहे "कोरोना" आटोक्यात नाही त्याच्या सोबत राहूनच या संकटसमयी खबरदारी घेत मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज होऊया..!
सोबत आपल्या साठी नियमीत दुकाने सुरू करणेबाबत तसेच विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल सुरू करणेबाबत महत्वाच्या सुचना व नियम आणि ग्रामपंचायत वतीने केलेले नियोजन pdf स्वरूपात दिले आहे.
सहकार्य करा.
*शिवतेजसिंह मोहिते-पाटील*
*सरपंच*
*अकलूज ग्रामपंचायत*
No comments