अबब ! सोलापूरात आढळले नवे 53 कोरोना बाधित रुग्ण
सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
सोलापूर शहरात एकूण 1160 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची झाली आहे.
आज दिवसभरात 290 चाचणी अहवाल प्राप्त झाले .यात 237 निगेटिव्ह, तर 53 पॉझिटिव्ह अहवाल मिळाले आहेत. यात 33 पुरुष आणि 20 महिलांचा समावेश आहे.
समाधानाची बाब म्हणजे आज एकूण 74 जणांना बरं झाले त्याना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. कोरोनामुळे आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात 4 पुरुष 3 महिलांचा समावेश आहे .त्यामुळे शहरातील एकूण मृतांची संख्या 101 झाली आहे.
आतापर्यंत उपचार होऊन घरी गेलेल्यांची संख्या 641 आहे तर सध्या 418 जणांवर उपचार सुरू आहेत.
No comments