माळशिरस । कृषी सहाय्यक यांनी लाच घेतल्याप्रकरणी झाली अटक
माळशिरस येथील कृषी कार्यालयातील कृषी सहायक यास सोलापूर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.राणू सोपान ओवाळ, रा. येळीव असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहायकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती असे की,तक्रारदार यांनी शेतीस अनुसुरून असलेले बी-बियाणे, खते,शेती साहित्याचे विक्री केंद्राचा परवाना काढणेकामी विहित पद्धतीने अर्ज सादर केला होता.सदरचा परवाना मिळवून देण्यासाठी ६ हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पथकाकडून सापळा रचून कारवाई करण्यात आली.राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक,संजय पाटील अपर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव पाटील,पोलीस उप अधीक्षक,कविता मुसळे,पोलीस निरीक्षक,अर्चना स्वामी,पकाले,सन्नके ,शाम सुरवसे या पथकाने कारवाई केली.
No comments