सोलापूर । नावनोंदणी करा नि घ्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण
आपली नावनोंदणी करून मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची सुविधा सोलापूर येथे बँक ऑफ इंडिया ने उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ही नामी संधी चालून आली असून यामध्ये शेळी पालन, मोबाइल दुरुस्ती व देखभाल, शिवण कला (महिलांसाठी), ब्युटी पार्लर (महिलांसाठी), फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी, दुग्ध व्यवसाय व गांडूळ खत, मोटार रिवायंडिंग, दुचाकी दुरुस्ती व देखभाल, कागदी पिशवी तयार करणे, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती, मेणबत्ती तयार करणे, रेशीम उद्योग आदी. ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी ९४०३४४६०४४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Comment
No comments