सोलापूर | उपायुक्त बापट यांचेवर गुन्हा दाखल, कामावर उपस्थित न राहिल्याचा आरोप

solapur Filed a case against Deputy Commissioner Bapat
सोलापूर महापालिकेचे नवीन आयुक्त पी. शिवशंकर यानी महापालिका उपायुक्त म्हणून नेमणुक होऊनही कामावर उपस्थित न राहिलेले अभिजीत बापट यांचेवर सदर बज़ार पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
सांगली येथून ते सोलापुर येथे वर्ग झाले होते. ४ सप्टेंबर २०१९ रोजी पासून ते मेडिकल रजेवर होते. कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांना  ३० मे २०२० रोजी नोटिस बजावली होती मात्र त्यावर त्यानी कोणताच खुलासा न केल्याने आयुक्त शिवशंकर यानी त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यानी फिर्याद दिली आहे. 

No comments