आता गायी, म्हशींसाठी ही मिळणार कर्ज

Loans-for-agribusiness

सोलापूरात आता पीक कर्जासोबतच गायी,म्हशी व शेळी पालनासाठी ही कर्ज देण्यात येणार आहे. 
देशी गाई, म्हैस यासाठी 17 हजार 460 रुपये, संकरित गाईसाठी 20 हजार 250 रुपये तर शेळी साठी 2700 रुपये कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात येणार आहे.7 टक्के व्याजदर व तीन ते सहा महिन्यांची फेड अश्या स्वरूपात हे कर्ज वाटप होणार आहे. 
राष्ट्रीयीकृत बँक व जिल्हा बँकेतून ही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गायी म्हशी सह कुक्कुटपालन मध्ये एक हजार गावरान कोंबड्या साठी 1 लाख 51 हजार तर बॉयलर साठी एक लाख 66 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी परतफेड कालावधी 45 दिवसांचा असणार आहे. मत्स्यव्यवसाय साठी 10 गुंठे साठी 29 हजार 600 तर वन औषधी लागवड साठी हेक्टरी 75 हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.

इथे करा अर्ज

जिल्हा अग्रणी बँकेने कर्जासाठी ऑनलाइन कर्जमागणीची सुविधा दिली आहे. त्यासाठी nicsolapur.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. पशुपालकाकडे उपलब्ध पशुधन, त्यांची खरेदीपावती, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन क्रमांक ही कागदपत्रे लागतील. त्यानुसार पीककर्ज वा पूरक उद्योगासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले.

No comments