सोलापूर । 'या' गावात नीरा उजवा कालवा फुटला
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गावात नीरा उजवा कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले तर पाण्याच्या प्रवाहाने शेतकऱ्यांच्या जमिनी व विहरींचे मोठे नुकसान झाले आहे.
नीरा उजवा कालव्याचे सांगोला शाखेतील क्रमांक 5 किमी 44 ला फुटून भगदाड पडले आहे. चिणके गावानजीक सोनारसिद्ध मंदिराजवळ दुपारी 4 चे सुमारास ही घटना घडली आहे.
आपत्कालीन दरवाजा न उघडल्याने हा कालवा फुटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर ज्या ठिकाणी कालवा फुटला आहे त्या ठिकाणी यंत्रसामग्री जाण्यास अडथळा होत असल्याने अजूनही पाणी गळती सुरू आहे.
No comments