माळशिरस । 'त्या' रुग्णांच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह

माळशिरस तालुक्यात संग्रामनगर, अकलूज येथे तालुक्यातील पहिले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील जवळपास सोळा लोकांचे अहवाल तपासणी साठी पाठवले होते. 
त्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून आजपर्यंत तालुक्यात फक्त दोनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे ही सांगितले आहे.

आरोग्य विभागाने दिलेली माहिती : 
🟣आरोग्य विभाग माळशिरस 
🔅COVID19 UPDATES🔅
दिनांक:-07/6/2020

 *माळशिरस तालुक्यात आज अखेर दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.* 
 
तालुक्यात आज रात्री 9.00 वाजेपर्यंत एकूण आत्तापर्यंत 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोना रुग्णांमध्ये अजून कुठलीही वाढ झालेली नाही. दिलासादायक बातमी म्हणजे संग्रामनगर रुग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.एकूण 4 स्वाब  तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. इतर तालुक्यात पॉझिटिव निघालेल्या केसमधील काही संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरू आहे. 
 तरी सर्वांनी  सतर्क रहावे.

प्रशासनाचे सर्व नियम पाळावेत. 

डॉ .रामचंद्र मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस.🟣

No comments