माळशिरस । अत्यावश्यक सेवेतील चालकांना Quarantine रहावे लागणार, तहसीलदार यांचे आदेश

Malshiras Quarantine drivers in essential services

माळशिरस तालुक्यातील वाहन चालक हे अत्यावश्यक सेवांतर्गत मालाची ने - आण करणेकरिता इतर जिल्हा / राज्यामध्ये प्रवास करुन माळशिरस तालुक्यामध्ये प्रवेश करीत असलेचे तसेच तालुक्यातील बहुतांश गावामध्ये वास्तव्य करुन मा . शासनाचे संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणेकामी असणाऱ्या दिशानिर्देशांचे पालन करीत नसलेचे आढळून येत आहे . सबब कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . 
तरी सर्व ग्रामस्तरीय समिती यांना या पत्रान्वये सुचित करण्यात येत आहे की , आपले अधिनस्त गावामध्ये वावर व वास्तव्य असणान्या वाहन चालकांना मंडळ । गांव स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या Institutional Quarantine Centre मध्ये वास्तव्यास राहणे बंधनकारक करावे . जेणेकरुन भविष्यामध्ये प्रादुर्भावास प्रतिबंध होवून त्यावर नियंत्रण ठेवणे सोईचे होणार आहे . सदर बाबीचे पालन न केलेस भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम , 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , 2005 मधील तरतुदीनुसार संबंधीतांवर कारवाई करुन याबाबतचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करण्यात यावा असे आदेश मा तहसीलदार सो यांनी दिले आहेत.. ,

No comments