कोरोना अपडेट । सोलापूरात 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, 6 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात ८ जण कोरोनामुक्त, नवे २८ बाधित तर ६ जणांचा मृत्यू
एकूण रुग्ण ११८८, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ६४९, मृत रुग्ण १०७ तर ४३२ रुग्णांवर उपचार सुरु
आज १९१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १६३ अहवाल निगेटिव्ह तर २८ अहवाल पॉझिटिव्ह तर ८ जण कोरोनामुक्त झाले असून ६ जणांचा मृत्यू झाले आहे. अद्याप १६८ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
शनिवारी मृत्यू पावलेले निलम नगर, एमआयडीसी, एकता नगर, दक्षिण सदर बझार, भारतरत्न इंदिरा नगर, भवानी पेठ, वडार गल्ली, बुधवार पेठ या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
No comments