गुडन्यूज । अनलॉक मध्ये सोलापुरातील 'या' सेवा सुरू करण्याचे आदेश

अनलॉक एक मध्ये सोलापूर जिल्ह्यातील महा इ सेवा केंद्रे, सेतू सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 
कोविड 19 मुळे मार्चपासून ही सुविधा केंद्रे बंद होती आता जिल्हाधिकारी यांनी नियमावली चा अवलंब करीत ही केंद्रे सुरू करता येणार आहेत. मात्र या केंद्रात कोणालाही प्रवेश नसणार आहे. फक्त फोटो काढण्यासाठी मास्क काढता येईल इतर वेळेस मास्क वापरावा लागणार असून सॅनिटायझेर, सोशल डिस्टन्स आदींचे नियम पाळून सेवा देता किंवा घेता येणार आहेत. 
मात्र या केंद्रवर किंवा त्यांचे मार्फत कोठेही शिबिरे घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. 

No comments