गुडन्यूज । रेशन दुकानदारांचा संप मिटला


राज्यात सुरू असणारा रेशन दुकान दारांचा संप मिटला असून त्यांना शासनाकडून विमा कवच देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोना महामारी व लॉक डाऊन मध्ये सर्वसामान्य जनतेची या संपामुळे मोठी अवहेलना होत होती. मात्र आता रेशन दुकानांवर परत धान्य वाटपास सुरुवात होणार आहे. 
शासनाने आम्हांला विमा कवच देण्याचे मान्य केले असून आजपासून हा संप मागे घेण्यात येत आहे. आजपासून च रेशन धान्य वाटपास आम्ही सुरुवात करीत आहोत. प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार ! - विजय मंडलिक, जिल्हा संघटक, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, सोलापूर जिल्हा
 
🔴⚖️ *सोलापूर शहर व जिल्हा सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघ ,सोलापूर.* ⚖️🔴

 _सोलापुर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व रेशन दुकानदार बांधवांना कळविण्यात येते की,_ 
_कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटपावेळी राज्यभरातुन अनेक दुकानदार ह्या महाभंयकर रोगराईला बळी पडलेले आहेत.काही मृत्यु तर काही उपचार घेत आहेत._
 *आपले प्रमुख मागणी रेशन दुकानदारास ५० लाखा चा विमा कवच ची मागणी होती.*  _शासनाकडून ह्या लढ्यातील सर्व योध्दानां ५० लाखाचे विमा संरक्षण कवच देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ह्यापुढे ही दुकानदारांनी संघटीत रहावे. व *धान्य वाटपाला सुरुवात करावे.*_
 _संप काळात दुकानदारांनी खंबीर पणे संघटने सोबत राहीलात त्याबद्दल आपले मनापासुन अाभार._ 
धन्यवाद 🙏🏻
आपला 
*सुनिल अ.पेंटर* 
  जिल्हाध्यक्ष ✍🏻

No comments