पाच लाखांचा देशी दारू बनवण्याचा मुद्देमाल जप्त

Five-lakh-worth-of-native-liquor-confiscated
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीचा देशी दारू बनवण्यासाठी चाललेला मुद्देमाल जप्त केला आहे. 
साखर कारखाना मधील अधिकाऱ्यांशी संगनमत करून दोघेजण 22 हजार 500 रुपये किंमतीचे 7.5 टन गूळ मिश्रीत मळी, 18 हजार 500 रुपयांचे लोखंडी बॅरेल हे सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या आयशार टेम्पो मध्ये घेऊन जाताना लोटेवाडी, ता. सांगोला येथील हॉटेल पंचरत्न समोर ही कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये एकुण सुमारे ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
टेम्पो चालक ज्ञानेश्वर जगताप व सहकारी शंकर भिसे दोघे रा. सोलापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एम एच 25 यु 0131 हा टेम्पो जप्त केला आहे. 

No comments