सोलापूर जिल्हा कारागृहातील आणखीन २६ जण कोरोना पॉझिटिव्ह

Solapur jail
जिल्हा कारागृहातील २६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळच्या सत्रात सिव्हिल हॉस्पीटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये ४० जण पॉझीटिव्ह तर ११६ जण निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हमधील ६७ जण जेलमधील आहेत.

जेलमधील कैद्याला सुरूवातीला लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर जेलमधील सर्व कैदी व कर्मचाºयांची तपासणी करण्याचा निर्णय जेल प्रशासनाने घेतला. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही तपासणी केली. यामध्ये दोन कर्मचारी व नंतर एकाचवेळी ३४ जण पॉझीटिव्ह आले. त्यानंतर मंगळवारच्या अहवालात २६ जण पॉझीटिव्ह आले आहेत.

No comments