30 जूनपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार
ATM मधून कोणत्याही बँकेच्या एटीएमधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शूल्क देण्याची आवश्यकता नव्हती. तसेच बचत खात्यातील कमीत कमी शिल्लक ठेवण्याच्या नियमातही सूट देण्यात आली होती. लॉकडाऊन मध्ये सुरु झालेला हा अध्यादेश जून महिन्यात संपणार आहे.
3 महिन्यांकरता एटीएम चार्जेज हटवण्यात येतील अशी घोषणा 24 मार्च रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. जून महिन्यात ही सूट संपणार आहे, मात्र अद्याप याची डेडलाइन वाढवण्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तुम्हाला माहिती असेल शक्यतो बँकेत खाते असलेल्या एटीएममधून 5 वेळा पैसे काढल्यास बँका कोणतेही शुल्क आकारत नाहीत.
दुसऱ्या बँकांसाठी ही मर्यादा 3 ट्रान्झॅक्शन इतकी आहे.या मर्यादेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास - 8 ते 20 रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जातात नक्कीच आता हे चार्ज परत सुरु होऊ शकतात.
![]() |
| Advt |


No comments