बारा वाळूमाफियांना पोलिसांनी केले तडीपार
इंदापूर येथील दोन टोळ्यातील बारा वाळू माफियांना पुणे जिल्हा पोलिसांच्या वतीने पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यामधून तडीपार करण्यात आले आहे.
महेश अर्जुन याच्या टोळीतील महेश महादेव अर्जुन (वय 29, रा.
चिखली), कुलदीप पोपट रकटे (वय 27, रा. रणगाव), पिंटु ऊर्फ दीपक औंदुबर उबाळे (वय 38, रा. वालचंदनगर), तेजस शिवाजी जाधव (वय 24, रा. कळंब), निखील हरी भोसले (वय 28, रा. लासुर्णे), सचिन शिवाजी अर्जुन (वय 37, रा. चिखली, ता. इंदापूर) तर
बबलू पवार याचे टोळीतील बबलू ऊर्फ सौरभ मनोहर पवार (वय 32), प्रीतम सुरेश जाधव (वय 32), सचिन अर्जुन गोसावी (वय 31), बापू ऊर्फ अनिकेत शिवाजी रणमोडे (वय 28), संदीप रामभाऊ गोसावी (वय 28), युनुसरहिम नसीद पठाण (वय 32, सर्वजण रा. रणगाव, ता. इंदापूर) यांना तडीपार करण्यात आले आहे.
यामधील महेश अर्जुन या टोळीतील सहा जणांना सहा महिन्यांसाठी इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यातून तर बबलू पवार यांचे टोळीतील सहा जणांना तीन महिन्यासाठी दौड तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माढा व पंढरपूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.
No comments