तो रस्त्यावर थुंकला नि अशी घडली अद्दल !
सध्या जगात कोरोना व्हायरस मुळे नियम अधिक कडक करण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना पाहायला मिळत आहे. याचाच धडा एका तरुणाला चांगलाच मिळाला.
पुण्यात एक तरुण जाताना रस्त्यावर थुंकला नि त्यांचेवर महानगरपालिका कडून कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई इतकी जबरदस्त होती की पाहणारे सुद्धा थक्क झाले. तो जिथं थुंकला तो परिसर त्याला स्वतःच्या शर्टने साफ करावा लागला.
राज्यात सर्वच नियम कडेकोट करून त्याचे पालन करण्यात येत आहे. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी थुंकला तर तुम्हांला कारवाई करून सहा महिन्यांपर्यंत जेल ची हवा सुद्धा खायला लागेल असे सरकारने यापूर्वी चं स्पष्ट केलं आहे.
यापुढे असेच नियम मोडत राहिला तर महानगरपालिका कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता थुंकी बहाद्दर लोकांनी जपून राहिलेलं बर असणार आहे.
No comments