राज्यात लवकरच होणार दमदार पाऊसाचे आगमन
तसे पाहिले तर सात जून हे पावसाचे मुहूर्त असते रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात झाली. राज्यात दरवर्षी मृग नक्षत्राच्या आधी पाऊस होत असतो मात्र यंदा तसे झाले नाही. दरम्यान चक्रीवादळाचा देखील पावसावर थोडा परिणाम झाला आहे असे हवामान विभागाने म्हटलं आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकणातून मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.
दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
येत्या काही दिवसांत मान्सूनची प्रगती होत आहे अशातच महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
- पहा कशी आहे पुढील हवामान स्थिती
- 9 व १० जून रोजी - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता
- ११ जून रोजी - कोकण, मराठवाडा, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
- 12 जून रोजी - कोकणच्या किनारपट्टीलगत वादळी वाऱ्याची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार , तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
No comments