भावा बहिणीची हत्या करून केली मोठी चोरी

Big-theft-committed-by-killing-brother-and-sister
सख्या भावा बहिणीची हत्या करून घरातील ऐवज व रोख रकमेची मोठी चोरी केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली असुन या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
आई वडील हे शेतीच्या कामासाठी जालना या ठिकाणी गेल्यावर किरण लालचंद खंदाडे राजपूत वय 18 व सौरभ लालचंद खंदाडे राजपूत वय 16 हे दोघे भाऊ बहीण घरात असल्याचे पाहून घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये हे दोघेही भाऊ बहिणीची हत्या करून घरातील दीड किलो सोने व सहा हजार रोख रक्कम लुटून नेली आहे. 
सौरभ हा इयत्ता 10 वि मध्ये शिकत होता त्याने नुकताच दहावीची परीक्षा ही दिली होती तर किरण पुण्यात बी ए च्या प्रथम वर्षाला शिकत होती. 
आई वडील जालना हुन घरी आल्यावर त्यांना आपल्या मुलांचे मृतदेह गळा चिरून बाथरूम मध्ये फेकून दिल्याचे दिसले व त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

No comments