चारचाकी गाडी विहरीत पडून तिघांचा मृत्यू

Three-killed-as-four-wheeler-falls-into-well
चारचाकी गाडी विहरीत पडून आई व दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात ही घटना घडल्याचे समोर येत असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, 
पुणे जिल्हाच्या हवेली तालुक्यातील  अष्टापुर येथे दुर्दैवी घटना घडली. चारचाकी गाडी रस्तालगत असलेल्या विहीरीत पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अष्टापुर येथील सचिन श्रीहरी कोतवाल हे त्याच्या पत्नी व दोन मुलासह गाडीतून जात असताना राञी उशीरा हा अपघात झाला. अपघात सचिन कोतवाल बचावले माञ त्यांची पत्नी  शितल कोतवाल,मुलगा शौर्य आणि मुलगी सृष्टी या तिघांचा  दुर्दैवाने मृत्यू झाला. 

No comments