सोलापूरात सुरू झाला कांदा लिलाव
लॉक डाऊन मध्ये जवळपास अडीच महिने बंद असलेला कांदा लिलाव काल सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी दोनशे गाड्यांची आवक पाहायला मिळाली आता हळूहळू ही आवक मोठया प्रमाणात वाढेल असा विश्वास व्यापारी व शेतकरी वर्गाने वर्तविला आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात ही कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी फक्त सोमवार नि गुरुवार या दोनच दिवशी कांदा लिलाव सुरू राहणार असल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जवळील शंभर किलोमीटर अंतरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. सोशल डिस्टन्स पाळून हा लिलाव यशस्वी पार पडला. त्यामुळे आता बाहेरील शेतकरी ही माल आणण्यास तयारीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी सरासरी प्रति क्विंटल सहाशे ते सर्वाधिक आठशे रुपये भाव मिळाला आवक जावक वाढल्यावर हा भाव आणखी वाढण्याची संकेतही काही व्यापारी वर्गाने दिले आहेत.
No comments