डोक्यात दगड घालून मित्रानेच केला मित्राचा खून
डोक्यात दगड घालून मित्रानेच आपल्या मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे.
हातकणंगले येथील कोरोची येथील एका मित्राने दारू पिण्याच्या कारणावरून आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घातला व त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. अंकुश मारुती मोरे, वय 60,मूळ गाव कारी, सातारा व सध्या रा. धनगर माळ कोरोची असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मृत अंकुश मोरे हे एका कारखान्यात कामाला होते व तिथेच पाठीमागे खोलीत ते राहण्यास होते. आपल्या मित्रासोबत सोमवारी त्यांचे जेवणाचे नियोजन झाले त्याप्रमाणे त्यांनी एकत्र जेवणही केले मात्र त्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्या दोघात वाद झाला व त्यातून हे कृत्य झाले असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान यातील संशयित आरोपी फरार असून पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आहेत.
No comments