पिलीव येथे तीन दिवस जनता कर्फ्यु



मौजे ग्रामपंचायत पिलीव येथील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कोरणा प्रादुर्भाव संसर्ग रोखण्यासाठी ग्राम समिती अध्यक्ष यांच्या वतीने दिनांक. 18 जुलै 2020 ते 20 जुलै 2020 शनिवार ते सोमवार रोजी गावामध्ये तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू जाहीर झाला असून त्यामध्ये अत्यावश्यक सेवा मेडिकल व दवाखाने चालू राहतील तसेच इतर सर्व दुकाने बंद राहतील तरी पिलीव गावच्या सर्व नागरिकांना विनंती की सदर जनता कर्फ्यू मध्ये दुकान उघडल्यास अथवा विनाकारण फिरण्यास आपणावर कार्यवाही होऊ शकते तसेच आपणास दंडही भरावा लागू शकेल या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे हे गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून घरातून कामाशिवाय बाहेर न पडता सदर जनता कर्फ्यू सहकार्य करावे व व्यापारी व्यवसायिकांनी दुकाने बंद राहतील याची नोंद घ्यावी 
आदेशावरून
अध्यक्ष
गाव कृती समिती पिलीव
ग्राम समिती पिलीव.

No comments