कंटेनरच्या धडकेत २९ वर्षीय तरुण जागीच ठार


A-29-year-old-man-was-killed-on-the-spot-in-a-container-collision

सांगोला महूद रोडवरील कंटेनर च्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कंटेनर विरुद्ध बाजूने आला व दुचाकी ला समोरून धडक दिली असा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नि सांगितले.
हा अपघात सांगोला महूद रोडवरील खंडोबा मंदिर परिसरात झाला आहे. अविनाश पोतदार, वय २९, रा. महूद, ता. सांगोला असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विठ्ठल क्षीरसागर, रा. तिसंगी असे जखमीचे नाव आहे.उपचारासाठी क्षीरसागर यांना पंढरपूर येथे हलविण्यात आले आहे.


No comments