फार्म हाऊस च्या मॅनेजर वर गोळीबार


Firing-on-the-manager-of-the-farm-house

पुणे जिल्ह्यातील मावळ मधील वाहनगाव येथे असणाऱ्या फार्महाऊस च्या मॅनेजर वर दोघांनी गोळीबार केला आहे यामध्ये मिलिंद माणेरीकर हे मॅनेजर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
वडगाव मावळ परिसरात संकल्प हे फार्महाऊस आहे याच फार्महाऊस वर माणेरीकर हे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सकाळी ११ चे सुमारास अज्ञात दोन इसमानी गाडीवर येऊन गोळीबार केला यामध्ये मिलिंद यांच्या पोटाला एक गोळी लागली आहे. तसेच भरपूर रक्तस्राव ही झाला आहे. त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
दरम्यान पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून हा हल्ला कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर आले नाही. 


No comments