येरवड्यातून पळालेला एक कैदी सापडला
गणेश आदिनाथ चव्हाण असं या कैद्यांच नाव असून तो दरोडा व खून प्रकरणात जेलमध्ये आला होता.
येरवडा कारागृहातुन पाच कैदी दि. १६ जुलै रोजी खिडकीचे गज कापून पळून गेले होते. गणेश चव्हाण, देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, अजिंक्य कांबळे, सनी पिंटो अशी त्यांची नावे आहेत.
दौड मधील मेरगळ वाडी येथे पोलिसांनी सिने स्टाईल ने गणेश चव्हाण यांचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे पुणे ते दौड असा सुमारे 80 किलोमीटर चा प्रवास गणेश याने पायी चालत केला होता.
Post Comment
No comments